इ - पास काढून देण्याचा नावाखाली प्रवाशांची होतेय आर्थिक फसवणूक : गुरुनाथ पाटील

पनवेल :- पनवेल तालुका महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांनी इ- पास काढून देण्याच्या बाबतीत प्रवाशांची होणारी आर्थिक लुटालूट थांबवावी या करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेल द्वारे निवेदन पाठवून निदर्शनात आणले आहे.

टाळेबंदी २. च्या अनुषंगाने नियमावली नुसार नागरिकांना फक्त अती महत्वाच्या कामानिमित्त जिल्हा अंतर्गत प्रवेश करण्याकरता इ- पासची आवशक्यता आहे असे असून देखील आत्ताच्या कोव्हीडच्या परिस्थिती काही संधी साधू लोक इ - पास काढून देण्याच्या नावावर फसवणूक करताना दिसत आहे, याकरिता लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढून उपाययोजना करावी अशी मागणी सदर मेल द्वारे गुरुनाथ पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
Comments