शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळंबोली येथील द.ग.तटकरे महाविद्यालयात शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास बबनदादा पाटील आणि कळंबोली शहरप्रमुख डी.एन.मिश्रा यांच्यानेतृत्वाखालीआयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिराला कळंबोली वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत वाढती रुग्णसंख्या आणि अपुर्‍या रक्तसाठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांना शिवसेनाप्रमुख या नात्याने आदेश दिले होते. या आदेशाला समोर ठेवून कळंबोली शिवसेना शाखा आणि खारघर येथील नवी मुंबई ब्लड बँकेच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजक कैलास बबनदादा पाटील, कळंबोली शहरप्रमुख डी.एन.मिश्रा यांच्यासह निलेश पाटील, अभी पाटील, अविनाश पाटील, जमील शेख यांनी प्रथम रक्तदान केल्यानंतर एकूण 87 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवत कोरोनाचे नियम पाळून सहभाग नोंदविला. 
यावेळी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपले मत मांडताना सांगितले की, कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. कोरोनासोबत अन्य आजारांचेही प्रमाण जैसे थे आहे, अशा स्थितीत ज्या ब्लड बँका आहेत, त्यांना रक्त संकलन करता आले नाही. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या पद्धतीने कैलास आणि बबनदादा पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, असे आयोजन सातत्याने सर्वच राजकीय पदाधिकार्‍यांनी, सामाजिक संस्थांनी करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महानगरपालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरामध्ये शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, ग्रामीण तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, ग्रामीण तालुका संघटक रामदास पाटील, ग्राहक कक्ष उपजिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे, तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर, विभागप्रमुख विश्‍वास पेटकर, माजी तालुकाप्रमुख आत्माराम गावंड, माजी सभापती देविदास पाटील, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, प्रभाकर गोवारी, ग्राहक कक्ष शहरप्रमुख किरण तावदरे, अरुणभाई कुरूप-स्वरुप, युवासेना समन्वयक अभिमन्यू पाटील, प्रसिद्धी प्रमुख पराग मोहिते, कळंबोली युवासेना अरविंद कडव, तळोजा विभागप्रमुख मुरलीधर म्हात्रे, कळंबोली उपशहरप्रमुख जमील खान, महेश गुरव, के.के.कदम, सचिन मोरे, पिंट्या कडगारी, माजी शाखाप्रमुख महेंद्र दुबे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments