खारघरजवळील उड्डाण पुलावर वाहनांचा अपघात
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेलजवळील सायन पनवेल महामार्गावरील खारघर येथील उड्डाण पुलावर झालेल्या वाहनांच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. 
या अपघातात बीएमडब्लू कार एमएच.09,ईके6688 व एर्टिगा कारला एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आणखी दोन वाहने देखील या वाहनांना धडकले असून लॉकडाऊन असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ नसल्याने अपघातावेळी मार्गावर वाहतुक कोंडी झाली नाही. घटनास्थळी खारघर वाहतूक, पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला.जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

Comments