पनवेल तालुका पोलिसांनी जपली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी ; सील आश्रमास जीवनावश्यक वस्तूंची भेट

पनवेल, दि.१५ (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकीसह सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील वांगणी गाव येथे असलेल्या सील आश्रम नामक सेवाभावी संस्थेला मदतीचा हात म्हणून वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज केले.

पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वांगणी गाव येथे ’सील आश्रम’नामक सेवाभावी संस्था कार्यरत आहे. तेथे अनाथ, बेवारस व रस्त्यावर जखमी अवस्थेत मिळुन येणारे फिरस्ते इसम, महिला व अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची शुश्रूषा व पालनपोषण केले जाते. त्यांचे पालक/नातेवाईक मिळून येताच त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात येत असते. सध्या तेथे एकूण 276 पिडीत व्यक्ती दाखल आहेत.  पोलीसांना मिळून आलेले बेवारस व्यक्तींनाही सदर संस्थेत दाखल करीत असल्याने त्यांची पोलीस विभागास सातत्याने मोलाची मदत होत असते. 

सध्या शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सदर संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर श्रीमती जैनम्मा यांनी सध्या त्यांचे संस्थेत असलेले पीडिताना दैनंदिन गरजेसाठी आवश्यक वस्तू व अन्नधान्य अपुरे असल्याने पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांना संपर्क साधून चिंता व्यक्त केली होती. सदरची बाब पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या निदर्शनास आणून दिली व सदर संस्थेस तात्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या असता त्यानुसार आज सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर, अंकुश खेडकर, नेरे बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ व अंमलदार मिळून सील आश्रम, वांगणी येथे भेट देऊन त्यांना --
साखर- 150 किलो, 
रवा- 150 किलो, 
आटा- 200 किलो, 
चना- 120 किलो, 
तूरडाळ- 120 किलो, 
पोहे 200 किलो, 
15 लिटर सॅनिटायजर, 
500 मास्क, 
3,000 पाकीट सी-विटामिन व झिंक गोळ्या इत्यादी सात दिवस पुरेल इतका अन्नसाठा व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला व भविष्यात देखील करीत आहोत. 
सदरवेळी सदर संस्थेचे संस्थापक फादर के.एम.फिलिप्स, प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती जैनम्मा व संस्थेत दाखल असलेले पीडित महिला, पुरुष व अल्पवयीन मुले उपस्थित होती. अशा कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे त्यांनी पोलिसांचे आभार मानून त्यांना आभाराचे पत्र सुद्धा दिले आहे.

फोटो ः सिल आश्रम या संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image