पुस्तकाचे बनावटीकरण करून विक्री करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः कंपनीने प्रकाशित केलेल्या मुळ पुस्तकाचे बनावटीकरण करून त्याची विक्री केल्याप्रकरणी खांदेश्‍वर पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई येथील सुधीर गोकर्ण यांच्या मालकीची पॉप्युलर पब्लिशर्स आणि डिस्टीब्युटर्स प्रा.लि. नावाची कंपनी आहे. कोरोनाच्या शासन नियमाप्रमाणे ऑनलाईन सीबीएससीची विभागाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी त्यांच्या कंपनीमार्फत वेबसाईटवरुन पुस्तकांची विक्री सुरू आहे. खांदा वसाहत येथील एका दुकानात सदर पुस्तकांचे बेकायदेशीरित्या विक्री सुरू असल्याची माहिती गोकर्ण यांना मिळाल्याने यावेळी गोकर्ण यांनी त्या इसमाला विचारणा केली असता त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कंपनीची बनावट पुस्तके तयार करून विक्री केल्याप्रकरणी सुरेश चौधरी व दिपाराम चौधरी यांच्याविरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments