लाखो रुपये किंमतीचा चरस अंमली पदार्थ मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेतर्फे हस्तगत ; एक आरोपी गजाआड..


पनवेल, दि.१७ (संजय कदम) ः लाखो रुपये किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने हस्तगत केला असून याप्रकरणी एका आरोपीला गजाआड केले आहे.
पनवेल तालुक्यातील मुंब्रा-पनवेल महामार्गावर संतोष वजन काट्याच्या बाजूने वेअर हाऊसकडे जाणार्‍या रस्त्यावर काही इसम चरस हा अंमली पदार्थ घेवून येणार असल्याची माहिती मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डोंगरे, सपोनि निलेश तांबे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी जैतूल आबिद अली बोेहरी (26) याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून जवळपास 2 लाख 51 हजार रुपये किंमतीचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. त्याचप्रमाणे रोख रक्कम व मोबाईल फोन असा मिळून 2 लाख 56 हजार 400 रुपये किंमतीचा या पथकाने ताब्यात घेतले असून यावेळी त्याचा सहकारी पसार झाला असून त्याचा शोध मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा घेत आहेत.
Comments