पोलिस असल्याचे सांगून अडीच लाखाच्या दागिन्यांची चोरी...

पनवेल, दि.१३ (वार्ताहर) ः  पोलीस असल्याचे सांगून 64 वर्षीय इसमाकडील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले असून त्यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खारघर सेक्टर 4 येथील दत्ताराम शिवराम मावळे हे त्यांच्या पेन्शनचे पैसे बँकेच्या खात्यात जमा आहेत का याची चौकशी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सेक्टर 4 खारघर येथे गेले होते. ते त्यांचे काम आटपून घरी परत जाण्यास निघाले असताना बेलपाडा रोडने चालत जात होते. यावेळी एका मोटरसायकल वर आलेल्या इसमाने त्यांना बोलावले व तो पोलिसवाला असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची चैन त्याने पिशवीत ठेवायला सांगितली. यावेळी मोटर सायकल वर बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातून सोन्याची चेन ठेवलेली पिशवी घेऊन तिला गाठ मारली व ती रुमालात गुंडाळून दत्ताराम यांना परत केली. व ते मोटरसायकलवर निघून गेले. दत्ताराम यांनी पिशवी उघडून त्यात सोन्याची चैन आहे का याची खात्री केली असता चेन सापडून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image