कळंबोली / वार्ताहर : सर्वसामान्य नागरिकांनाही डिजिटल होता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामीण नागरिकाना प्रशिक्षित करण्याच्या उद्देश्याने PMGDisha ह्या प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत श्रिया फाऊंडेशन, पाले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरळवाडी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी वाडीतील प्रशिक्षार्थींची नोंदणी करून त्यांना दहा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येइल ह्या प्रशिक्षणांंनतर आदिवासी बांधवही घरी बसुन मोबाइलद्वारे आपले आर्थिक तथा ईतर सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करु शकतील याशिवाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेऊन उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना भारत सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर कडून प्रमाणपत्र देण्यात येईल अशी माहिती CSC सेंटरच्या संचालिका तथा श्रीया फौंडेशनच्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे यांनी दिली. यावेळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, श्रीया फाऊंडेशनचे विश्वस्त संदीप म्हात्रे, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.के. म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक सी. के. म्हात्रे, भरत पाटील, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड, जनसंपर्क अधिकारी राजेश रसाळ यांच्यासह लक्ष्मण पवार, दशरथ वाघे, गुरू वाघे, संतोष पवार, शकुंतला वाघे, सुवर्णा वाघे, सोनाली पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.