पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून केले जखमी...

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पतीने विकत घेतलेल्या दुकानाचा गाळा पत्नीने परस्पर विकल्याने संतप्त झालेल्या पतीने ती झोपेत असताना तीच्या डोक्यावर हल्ला करून तीला जखमी केल्याची घटना पनवेल जवळील आसुडगाव येथे घडली आहे.

आसुडगाव येथे राहणारे मुकूंद देशमुख (53) व त्यांची पत्नी पौर्णिमा (47) हे आपल्या मुलांसह राहतात. मुकूंद हे गोवंडी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांनी नवीन पनवेल सेक्टर 9 येथे दुकानाचा गाळा विकत घेवून तो त्यांच्या पत्नीच्या नावे केला होता. त्यांच्या पत्नी व मुलाला रसायनी भागात एक वन बिचके फ्लॅट विकत घ्यावयाचा होता. त्यामुळे पौर्णिमा यांनी आपल्या पतीला काही एक न सांगता त्यांच्या नावे असलेल्या गाळा परस्पर विकून टाकला. हा प्रकार मुकूंद यांना समजल्यावर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले व त्या झोपेत असताना त्यांच्या डोक्यात हातोडा मारल्याने त्या जखमी झाल्या आहेत. ही बाब त्यांचा मुलगा अद्वेत याच्या लक्षात येताच त्याने आईला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले व वडिलांविरुद्ध खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Comments