कळंबोली पोलिसांकडून कातकरीवाडीमध्ये धान्य वाटप...
पनवेल, दि.१७ (संजय कदम) ः  सध्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर तळागळातील गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून कळंबोली परिसरात असलेल्या कातकरीवाडीतील गरजू बांधवांना धान्य वाटप वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कळंबोली पोलीस ठाणेकडून पोलीस ठाणे हद्दीतील फूडलँड कंपनीच्या मागील कातकरीवाडीमध्ये ५० ते ६० गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. सदरवेळी मास्क व सामाजिक अंतर याचे पालन करण्यात आले होते. 

Comments