पनवेल / प्रतिनिधी :- कोरोनाचा परदुर्भाव असल्या कारणाने अत्यंत सध्या व वेगळ्या सामाजिक कार्य करत पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेल या वर्षी आगळी वेगळी जयंती साजरी सकाळी 10.30 ला झेंडा वंदन करून सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम करण्यात आले या वर्षी सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त मूर्ती पूजन व अभिवादन कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला खांदेश्वर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नगरसेवक गणेश कडू ,क्षितिज पर्व संपादक सनिप कलोते पत्रकार निलेश मोने हे ही अभिवादन करण्यासाठी आले होते , सर्व रहिवाशी नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लांबूनच दर्शना घेता यावे अशा उंचीवर व्यवसाथ करण्यात आली होती, सर्वाना विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या व भारत देशासाठी दिलेले योगदान चे फलक लावून सर्वां पर्यंत माहिती पोचवन्यात आली तसेच पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील गोर गरीब गरजू ना कपडे वाटप करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.
हा कार्यक्रमात कोरोना नियमाचे पालन करत आयोजन पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने केले होते, या संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव - राहुल पोपलवार ,सह सचिव - विनोद खंडागळे, खजिनदार - भानुदास वाघमारे , संघटक - कैलास नेमाडे, व सदस्य :- हेमा रोड्रिंक्स , संतोष जाधव, संतोष ढोबळे, संजय धोत्रे,अजय दुबे , अमेय इंगोले, शोभा गवई, वली महमद शेख आदी पदाधिकारी सदस्य आहेत.
या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दीपक खरात,राजू कांबळे व गोपाल उबाळे, अविनाश पराड, उमेश पलमटे, आमन तायडे, धीरज नाईक, रोहित पवार,नितीन बोराडे, रोहित चव्हाण,अनिल वानखेडे, संतोष रामपाल, अमोल डाके करण उबाळे, विशाल चव्हाण,आदींनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पडला