पनवेल शहर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...
पनवेल / वार्ताहर :- नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह व पोलीस सह आयुक्त डॅा. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी पनवेल मधिल दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्याने आज दिनांक २२/०४/२०२१ रोजी  सांगुर्ली, तुरमाळे, तक्का गाव, कातकरी वाडी, मोसारे, आवळीचा माळा, गराडा, बाबळेवाडी, पाटनोली व करंजाडे या भागातील आदिवासी व झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या सुमारे ५५० गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे २५०० व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे तांदूळ,  गव्हाचे पीठ, डाळ, मिठ, तेल, मसाले, कांदे, बटाटे, चहा पावडर व साखर अशा दैनंदिन जिवनाश्यक वस्तूंचे त्यांचे गावात व परिसरात जाऊन वाटप करण्यात आले आहे. 
सदर रेशन वाटपासाठी पोलीस उपायुक्त, परि-२, पनवेल श्री. शिवराज पाटील व  सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग श्री. नितीन भोसले पाटील हे आवर्जून उपस्थित होते.
Comments