प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या,जीव वाचविण्यासाठी दात्यांना आवाहन;कामोठे येथील दिशा महिला मंचचा पुढाकार

पनवेल,(प्रतिनिधी) -- करोनाच्या संकटात जीव वाचविण्यासाठी आरोग्ययंत्रणा दिवस रात्र झटत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्यांना ऑक्सिजन देऊन विविध उपचारपद्धतीचाही अवलंबली जात आहे. मात्र, करोनाकाळात दाते कमी झाल्याने रक्तसाठा कमी झाला आहे. रक्तपेढ्यांमध्ये अपुरा रक्तसाठा याचबरोबर करोनातून बरे होण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या थेरपीसाठीही प्लाझ्मा कमी पडत आहे. करोनातून बरे झाल्यानंतर अॅन्टीबॉडीची उच्च पातळी असेपर्यंत प्लाझ्मा दान करता येतो. त्यामुळे पनवेल तालुक्यातील दात्यांनो प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या, असे आवाहन दिशा महिला मंचचे अध्यक्ष नीलम आंधळे यांनी केले आहे.

जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्राप्रमाणेच पनवेल तालुक्यात देखील कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील  शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप कोणतेही योग्य उपचार किंवा लस सापडली नाही. मात्र, कोरोना रूग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे चांगले परिणाम दिसून येत आहेत. कोरोनावरील संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी खूप उपयुक्त ठरली आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे सौम्य लक्षणं असलेले कोरोनाचे रुग्ण पाच दिवसांत बरे होत आहेत. मात्र, गंभीर आजारी असलेल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यात प्लाझ्मा थेरपी अपयशी ठरत आहे. गंभीर रूग्णांमध्ये ज्या रुग्णांचे अवयव कार्य करत नाहीत. ज्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते, अशा रुग्णांचा समावेश आहे. कोरोनापासून पूर्णतः व्यवस्थित बरा झालेला व्यक्ती डिस्चार्ज किंवा होम कोरंटाईननंतर 28 दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतो, त्याचे वय 18 ते 60 असावे तसेच वजन 50 किलोपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींनी प्लाझ्मा दान करू शकतो. त्याचबरोबर प्लाझ्मा दान केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रोगप्रतिकारशक्ती कमी होत नाही. प्लाझ्मा दिल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा 72 तासांनी प्लाझ्मा देऊ शकतो. अशा व्यक्तींनी कोरोना रुग्णांना जीवनदान देण्यासाठी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन दिशा महिला मंच चे अध्यक्ष नीलम आंधळे यांनी केले आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येणाऱ्या दात्याने नीलम 9702486286, विद्या 9773514151, उषा 9920638257, मोहिनी 9594001312 या नंबर संपर्क करावा असे आवाहन नीलम आंधळे यांनी केले आहे.
Comments