मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले अशोक बाग रहिवाशांच्या समस्येचे निरसन...
पनवेल / वार्ताहर :- विरुपाक्ष हॉल च्या समोरील अशोक बाग मधील ड्रेनेज लाईन रस्त्याच्या काम करते वेळीं ढिगाऱ्याखाली दबली गेली होती त्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्ण निकामी होऊन सांडपाण्याचा निचरा होत नव्हता.या विषयाची माहिती अशोक बाग मधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिली. रहिवाशांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेता कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांनी ड्रेनेज ची नवीन लाईन टाकून दिली आहे.प्रभागातील रहिवाशांच्या आरोग्याचा विषयला नेहमीच प्राथमिकता देतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments