तळोजा परिसरातून २ लाख ८८ हजार रुपयाचे गहाळ झालेले मोबाईल केले तळोजा पोलिसांनी हस्तगत
पनवेल, दि.२४ (संजय कदम) ः तळोजा परिसरातून वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 25 मोबाईल गहाळ झाले होते, त्याचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेेवून सदर मोबाईल आज परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना वाटप करण्यात आले.
तळोजा परिसरातून तसेच लातूर, त्र्यंबकेश्‍वर, चाळीसगाव, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई तसेच आसाम यासारख्या दूर राज्यात वापरण्यात येत असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय नाळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुधीर निकम, पो.हवा.वैभव शिंदे, पो.ना.वैभव शिंदे, पो.ना.दुर्वास पाटील, सचिन पवार, पो.शि.प्रवीण पाटील, अभिजीत दगडे, संदीप माने आदींच्या पथकाने याचा तपास करून सदर 25 मोबाईल हस्तगत केले आहेत व आज त्यांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले. 

फोटो ः मोबाईल वाटप करताना.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image