अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरीकाला खारघरमधुन अटक..

मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोची कारवाई,  
२० लाख रुपये किंमतीचे २०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त  

नवी मुंबई : खारघर सेक्टर-32 मध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरीकाला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने रविवारी दोन किमी पाठलाग करुन पकडले. केनिथ इझी (32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून नार्कोटिक्स ब्युराने त्याच्या जवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जफ्त केले आहे. केनिथ इझी हा अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून त्याला यापुर्वी देखील एनसीबीने अटक केली होती.  
खारघर सेक्टर-32 भागात एक नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार गत रविवारी सायंकाळी मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या पथकाने खारघर येथे त्याच्यावर पाळत ठेवली होती. यावेळी केनिथ इझी याला एनसीबीच्या पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने त्याच भागातील जंगलात पलायन केले. यावेळी एनसीबीच्या पथकाने नायजेरीयन नागरिक केनिथ इझी याचा सदर जंगलामध्ये 2 किमी पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 200 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले.  आंतरराष्ट्रीय बाजारात 200 ग्रॅम वजनाच्या मेफेड्रॉनचा दर सुमारे 20 लाख रुपये असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या वेस्ट झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली. या कारवाईत पकडण्यात आलेला केनिथ इझी हा अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून तो मुंबई तसेच नवी मुंबईत अंमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तसेच त्याला यापुर्वी देखील अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केनिथ इझी याला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने एनडीपीएस कलमाखाली अटक करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image