पनवेल दि.११ (वार्ताहर) - कार्यक्षम नगरसेवक तसेच मा.उपमहापौर विक्रांत पाटील नेहमी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यास प्राधान्य देत असतात व त्याच बरोबर विकासकामे, तलाव आणि मंदिरांचे सुशोभीकरण हे सुद्धा तेवढ्याच तत्परतेने करून घेतात.
प्रभागातील पनवेल तालुका पोलीस स्टेशन जवळील शिव मंदिरच्या आवारात शिवरात्रीचे औचित्य साधून आपल्या नगरसेवक निधीतून लोखंडी ग्रील व पत्र्याची शेड बसवून दिले आहे.याबद्दल शिवा विश्वनाथ पावन महादेव हॉलचे अध्यक्ष आणि प्रभागातील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले व जनहितार्थ करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
फोटोः शिवमंदिरात बसवून दिलेले ग्रील