केमस्पेक केमिकल मध्ये सुरक्षा सप्ताह संपन्न
 

पनवेल ता.१७ (वार्ताहर)- तळोजा औधोगिक वसाहती मधील केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तळोजा येथे ५० वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न सुरक्षा विभाग प्रमुख डी पी शेगेकर यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन.

केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या  औद्योगिक कारखान्यात सुरक्षा सप्ताहा निमित्त कामगार आणि कामगारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता, सुरक्षा निबंध आणि सुरक्षा घोषवाक्य अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी या स्पर्धांमधून अव्वल नंबर पटकावलेल्या कामगारांना बक्षीस वितरित करण्यात आले. या सप्ताहात  दरम्यान कारखाने मध्ये विविध प्रकारच्या सुरक्षा विषयक प्राप्त्येकक्षीकांचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तळोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व तळोजाचे फायर सेफ्टी ऑफिसर दीपक दोरुगडे उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे डायरेक्टर राजिंदर हरकारा, प्रबंधक संदीप ओझा, सुरक्षा विभाग प्रमुख डी पी शेगेकर व श्याम आहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सदाशिव आढागळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image