पनवेल, दि.२६ (संजय कदम) ः विवीध दुकानामधुन तसेच मॉलमधुन तेथील महागडे वस्तु , कपडे , तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमव्दारे सदर खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधीत विक्रेत्यांना दाखवुन त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते .
त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक , सेक्टर नं . ११ , जुहुगांव , वाशी , नवी मुंबई येथे दिनांक ० ९ / ०३ / २०२१ रोजी कपडे खरेदी करून ३८,००० / -रू कीमतेचे बिल पेटीएमन्दारे पेड केले असे भासवून अदा ब्युटीक मधील दुकानदार यांना पैसे पेड केल्याचा पेटीएम अॅपचा खोटा मेसेज दाखवुन अदा ब्युटीक या कपडयांचे दुकानाची फसवणुक झाल्याची घटना घडली होती .
सदर घटनेच्या अनुशंगाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाणे गु .र.नं १००/२०२१ भादवि कलम ४२०,३४ प्रमाणे नोंद करण्यात आला होता . सदर गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देवुन व वस्तुस्थिती समजावुन घेवुन तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारच्य मदतीने संक्षयीत आरोपीतांचा शोध लावला . त्यामध्ये मुख्य आरोपी नामे प्रेम नवरोत्तम सोलंकी . वय -३१ वर्षे , तसेच त्याची मैत्रीण प्रिती राजेश यादव , ( उर्फ तन्ची शर्मा ) वय २३ वर्षे , हीचे सह दुकानात प्रवेश करून खरेदीसाठी पती - पत्नी असल्याचे व खोटे नाव सांगुन सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच फसवणुक करताना ते पेटीएम स्पुफ नावाचा अॅपलेकशन व्दारे बनावट बिल पेड केल्याची पावती तयार करून दुकानदारांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . आरोपीताकडुन गुन्हयातील फसवणुक केलेले ३८,००० / - रू.किंमतीचे वेगवेगळया रंगाचे कपडे हस्तगत करण्यात आले आहेत.दोन्ही आरोपींताना वाशी न्यायायला समोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे . • अटक आरोपीची माहिती . :
१ ) प्रेम नवरोत्तम सोलंकी . वय -३१ वर्षे , धंदा - बेकार , रा.रूम नं २०१ , प्लॉट नं ५६ , सोनाविला सोसायटी , सेक्टर २१ , घणसोली नवी मुंबई
२ ) प्रिती राजेश यादव , ( उर्फ तन्वी शर्मा ) वय २३ वर्षे , व्यवसाय - गृहिणी , रा . .रूम नं २०१ , प्लॉट नं ५६ , सोनाविला सोसायटी , सेक्टर २१ , घणसोली नवी मुंबई • हस्तगत मालमत्ता ०१ मिळालेला माल
१ ) ४४०० / -रू.की ०४ काळया / पांढ - या रंगाची पॅन्ट
२ ) २१५० / -रू.की . ०१ कॉटन सुट .
३ ) १४५० / -रू.की .०१ कॉटन सुट .
४ ) ७,५०० / -रू.की . ०१ गोल्डन सुट ,
५ ) ४,२०० / -रू.की .०१ रस्ट ईनफ .
६ ) ६ , ९ ०० / -रू.की .०१ मस्टर सट
७ ) ९ ५०० / -रू.की .०१ बेग मस्टड
८ ) ३२०० / -रू.की .०१ ग्रीन बेग एकणु ३९ , ३०० / - रू.की. वेगवेगळया रंगाचे लेडीज कपड़े ( १३,०० रू.चे डीस्काउंड दिल्यामुळे ३८००० कपडे ) ०२ गुन्हा करतेवेळी १ ) ३०,००० / - रू.की.एम.एच .४८ एई २५४७ पांढ - या रंगाची चेसीस नंबर MEAJFSO4EF वापरलेले इंजिन नंबर JF50ET2372706 वाहन / मोबाईल २ ) ५,००० / रू.की . विवो कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल आयएमईआय नं ८६८४० ९ ०४१ ९ २६३०८,८६८४० ९ ०४१ ९ २६२ ९ ० सिमकार्ड ९ ७६६ ९९८८३.एअ कंपनीचा • असा एकुण ७४,३०० / -रू.की मुद्देमाल . अटक आरोपीतांनी अशाच प्रकारचे विविध गुन्हे नवी मुंबई परिसरात केल्याची दाट शक्यता असुन त्यादृष्टीने विविध मॉल , व्यापारी , ज्वेलर्स दुकानदार यांना संपर्क करून त्या द्ष्टीने माहीती काढण्यात येत आहे . सदरची यशस्वी कामगिरी मा.पोलीस आयुक्त , श्री.बिपीनकुमार सिंह , मा . पोलीस सह . आयुक्त , डॉ . जय जाधव ,, मा . पो.उप आयुक्त परिमंडळ- १ , वाशी , नवी मुंबई श्री . सुरेश मेंगडे , मा.सहायक पोलीस आयुक्त श्री . विनायक आ . वस्त यांच्या मार्गदर्शना खाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . रमेश चव्हाण , पोलीस निरीक्षक श्री . प्रमोद तोरडमल . ( गुन्हे ) , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक सचिन ढगे , पोहवा - शैलेंद्र कदम , पोलीस नाईक - सुनिल चिकणे , पोलीस शिपाई- गोकुळ ठाकरे , दिलीप ठाकुर , केशव ङगळे. यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे .