रिपब्लिकन सेनेत अनेकांचा प्रवेश ; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...
पनवेल / दि.४ (संजय कदम): रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच तरुणाचे प्रेरणास्थान स्वर्गीय हिरामण दादा गायकवाड यांच्या आशीर्वादाने आज अनेकांनी पक्षात प्रवेश केला. तसेच रिपब्लिकन सेना रायगडाच्या वतीने नवनिर्वाचित सुधागड तालुका शाखेची कमेटी निवड रायगड जिल्हाध्यक्ष भाई जीवन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली.आयु किरण हिरामनदादा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते.
         
रिपब्लिकन सेना सुधागड तालुकाध्यक्ष म्हणून संदेश संतोष भालेराव यांची नियुक्ती करून त्यांना जिल्हा कमेटीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच रिपब्लिकन सेना सुधागड तालुका सचिव नितीन हरिश्चंद्र गायकवाड, सुधागड तालुका कार्याध्यक्ष संदीप मनोहर कदम, राजेश नाना गायकवाड सुधागड तालुका प्रवक्ते, अशोक नाना गायकवाड सुधागड तालुका संघटक,दिलीप प्रकाश गायकवाड सुधागड तालुका संघटक, तसेच सुधागड तालुका सल्लागार कमिटीत देवराम जाधव. ढोकशेत, संजय गायकवाड. ढोकशेत,चंद्रकांत गायकवाड. नानोसे, दगडु गायकवाड.आमनोली, विश्वास गायकवाड. ढोकशेत, यशवंत गायकवाड. आमनोली,बालु पवार नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन कोकण प्रदेश नेते व्हि के जाधव, भाई सोनवणे ठाणे शहर अध्यक्ष, वसंत केदारी रिपब्लिकन नेते, पनवेल तालुकाध्यक्ष विजय भाई पवार, कळंबोली शहर अध्यक्ष विनोद दादा गायकवाड, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सुधागड तालुक्यातून मोठया संख्येने महिलावर्ग कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
             
(फोटोः पक्षप्रवेशासह नियुक्ती पत्र देताना जिल्हाध्यक्ष भाई जीवन गायकवाड)

Comments