भरधाव वाहनाची मोटारसायकलीस धडक; एक जखमी


पनवेल दि.१६ (वार्ताहर)- भरधाव होंडाई इलेन्ट्रा गाडीवरील चालकाने अचानक यू-टर्न घेताना मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना मोठा खांदा जवळच्या ब्रीज पुढील पहिल्या वळणावर घडली आहे.
           
होंडाई इलेन्ट्रा गाडीवरील चालक प्रिन्सी मक्कोलील (वय-४१) हे त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्यांनी संतोष सावंत यांच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.Comments