पनवेल / वार्ताहर :- स्वामी नित्यानंद मार्गावर पद्मावती अपार्टमेंट समोर पिण्याची पाईपलाईन लिकेज होऊन रस्त्यावर पाणी येऊ लागले होते.परिसरातील सोसायटीच्या रहिवाशांनी ही बाब कार्यक्षम नगरसेवक तसेच मा उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा अपव्यय नको म्हणून लगेच पालिका अधिकाऱयांशी बोलून त्वरित लिकेज असलेला पाईपलाईन चा भाग बदलून नवीन पाईप टाकून घेतला.
"माझा प्रभाग,माझी जवाबदारी" या अनुषंगाने काम करणारे कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील प्रभागातील समस्या सोडवण्यास नेहमी तत्पर असतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.