प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या दालनात बैठक संपन्न ...


पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर नोड मध्ये आलेल्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात नोटिसीबाबतचे समजगैरसमज दूर करण्यासाठी ५  मार्च रोजी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या दालनात महाविकास आघाडीतर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रेनगरसेवक गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, डॉ सुरेखा मोहोकर यांच्यासह पनवेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ चौधरीशिवसेना खारघर शहर अध्यक्ष शंकर ठाकूरराष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश रांजवनकाँग्रेसचे कलावत साहेबशेकापचे गुरुनाथ गायकरयोगेश निपानेकाँग्रेसचे लतीप नातखंडेराकेश चव्हाणअजित अडसूळ आदी उपस्थित होते. 

             खारघरचे डेव्हलपमेंट झालेली नाही. ४० टक्के डेव्हलपमेंट अजूनही बाकी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बाकी राहिलेले डेव्हलपमेन्ट सिडकोने पूर्ण करावी आणि त्यानंतर नोड ट्रान्सफर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. खारघर मध्ये सिडकोमार्फत सुखसोईसेवा डेव्हलपमेंट करायच्या बाकी आहेत. ते केल्यानंतर नोड ट्रान्सफर करा आणि त्यानंतर टॅक्स वसूल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नोटिस मिळाल्यापासून 21 दिवसांच्या आतमध्ये नागरिकांनी हरकती घ्याव्यात. टॅक्स कमी जास्त आलेला असेल तर हरकती घ्याव्यात असे आवाहन पालिकेने केले आहे. सिडकोकडून आणि महापालिकेकडून टॅक्स लावला जातोय. दोन्हीकडून टॅक्स लावण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. 

         यापूर्वीच खारघरच्या नागरिकांनी डेव्हलपमेंट चार्ज रलेला आहे. मात्र पूर्ण डेव्हलप न झाल्याने टॅक्स लावन्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे.  


५ वर्ष करवाढ करणार नाही हे सत्ताधाऱ्यांनी दिलेले वचन कुठे गेले. नागरिकांना सुविधा दिल्यानंतर कर घ्या. सिडको हद्दीतील नागरिकांनी सर्व्हिस चार्जच्या रूपाने कर भरलेला आहे. सिडकोकडून हस्तांतरित करा आणि तुम्ही सुविधा द्या आणि नंतर कर घ्या. निवडून आलात त्यावेळेस नागरिकांवर ५ वर्षे कोणतीही करवाढ करणार नसल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. -  प्रितम म्हात्रे  विरोधी पक्षनेते,  पनवेल महानगर पालिका 

Comments