म.ए.सो.आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,नविन पनवेल तर्फे "सन्मान शक्तीचा"

पनवेल / वार्ताहर :- गेले वर्षभर आपण सर्वजण कोविड १९ या संकटाचा सामना करत आहोत , या संकटात अनेकांनी आपले आपले कर्तव्य चोख बजावले आहे, परंतु या सर्व संघर्षात स्त्री शक्तीचे योगदान नक्कीच अतुलनीय आहे.या कालावधीत निर्भयपणे अनेक महिलांनी आपले कर्तव्य बजावत स्वहितापलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी अत्यंत धैर्याने, पूर्ण केली आहे. 
आर्थिक  संकट आल्यावर कुटुंबासाठी छोटेखानी व्यवसाय सुरू करून इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला अशा लघु उद्योजिका , डॉक्टर, परिचारिका , संस्कारवर्ग संचालिका , गीता प्रचारक , रिक्षा चालक , अनाथ आश्रमाच्या संचालिका, सरपंच  अशा एकूण १२ शक्तीदुर्गांचा शेला , कौतुक पत्र देऊन  माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका समिता सोमण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

८ मार्च , जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सन्मानित महिला सौ.करंदीकर , सौ. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका  मा.सौ . समिता सोमण यांनी केले."आपला सन्मान हा प्रातिनिधिक स्वरूपात सर्व महिला शक्तीचा आहे, आपले कार्य हे अतुलनीय आहे व हे कार्य आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे "असे गौरवोद्गार  त्यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात मांडले , या प्रसंगी प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. सौ.निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम.नमिता जोशी यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहा.शिक्षिका श्रीम. प्रीती धोपाटे यांनी केले,  विद्यालयाच्या सहा.शिक्षिका सौ.बापट यांनी आभार मानले .
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image