जास्त प्रमाणात खडी भरून रस्त्यावर सांडल्या प्रकरणी गुन्हा दाखल...


पनवेल दि.१६ (वार्ताहर)- डंपर मध्ये जास्त प्रमाणात खडी भरून ती रस्त्यावर पाडून इतरांची जीवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका डंपर चालकाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
         
डंपर चालक लालमणी शामलाल जैसवाल (वय-४४, रा.- धारावी) याने पळस्पे ते जेएनपीटी हायवेवर त्याच्या ताब्यातील डंपर मध्ये जास्त प्रमाणात खडी भरून ती रस्त्यावर पाडून इतरांची जीवीत किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Comments