रोडपाली येथील नियोजित स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचे काम सिडकोने त्वरित सुरू करावे ; खा.श्रीरंग बारणेंना शिवसैनिकांचे साकडे ..
पनवेल / दि.५ (वार्ताहर) :-  रोडपाली वसाहती मध्ये नियोजित असलेले आणि यापूर्वीच सिडको कार्यालयात पी.टी.उषा स्पोर्ट्स क्लब असे नामकरण झालेल्या भूखंडाचे काम सिडकोने त्वरित सुरू करावे यासाठी शिवसेना खासदर श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकार्‍यांनी खा.श्रीरंग बारणे यांची भेट घेेवून निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या आदेशाने आणि विधानसभा समनव्ययक प्रदीप ठाकूर व कळंबोली शहरप्रमुख डी एन मिश्रा यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली रोडपाली वसाहती मध्ये नियोजीत असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स संदर्भात खा.श्रीरंग अप्पा बारणे यांना गिरीश धुमाळ (माजी विभाग संघटक), आकाश विलास शेलार (विभाग प्रमुख) दीपक कोडावते (उप विभाग प्रमुख) नारायण फडतरे (महाराष्ट्र वाहतूक सेना-उपाध्यक्ष उरण तालुका ) सचिन बोराडे (उपविभाग प्रमुख) रोहन राऊत (शाखा प्रमुख) सुमित सुर्यवंशी (शाखा प्रमुख) निवेदन देण्यात आले. कळंबोली रोडपाली वसाहतीसाठी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स होणे गरजेचे असून यासंदर्भात खा.श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेवून सिडको प्रशासनाला त्वरित आदेश देऊन नियोजित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या कामाला सुरुवात व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.


Comments