कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते संघटनेच्या दोन कंपन्यांच्या नामफलकाचे अनावरण


पनवेल / वार्ताहर  न्यु मरीटाईम अँड जनरल  कमगार संघटनेच्या कार्यशैलीवर प्रभावित होवून रायगड ,नवी मुंबई मधील कामगारांचा ओढा संघटनेकडे वाढत आहे.त्याच बरोबर कामगार नेते महेंद्रजी घरत यांनी कोरोना  काळात कामगारांसाठी केलेल्या मदतीमुळे कामगारांना  महेंद्र घरत  यांचा  आधार वाटू लागलआहे. त्याचमुळे रायगड ,नवी मुंबई मधील कामगार महेंद्र घरत  यांचे  नेतृत्व स्विकारत  आहेत.

दिनांक 17 मार्च 2021 रोजी दोन कंपन्यांतील मे. बर्जर पेंट्स तळोजा MIDC व मे. रायटर बिझनेस सर्व्हीसेस महापे MIDC येथिल संघटनेच्या नामफलकाचे अनावरण  संघटनेचे अध्यक्ष तथा  महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी पि.के.रामण, वैभव पाटील, संजय ठाकूर, लंकेश ठाकूर, पि.एस.म्हात्रे, विजय दाभणे, भगवान ढोंगरे, नरेश पाटील, राजेश काठावले, प्रांजल भोईर, सुभाष तांडेल, सुनील पाटील, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, अरुण पाटील, नंदकुमार पांचाळ, बजरंग माने, संतोष सावंत, राहूल कांबळे व कंपन्यांतील  कामगार  उपस्थित होते.
Comments