संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? खासदार श्रीरंग बारणे यांचा लोकसभेत सवाल...


पनवेल  / २३ मार्च - संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसेजिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर आहे का,  केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहेअसे सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

खासदार बारणे म्हणालेसंसदेचे कामकाज सुरू असताना कोणाचेही फोन लागू नयेत यासाठी जामर लावले जाते. भारत सरकारची बीएसएनएल आणि एमटीएल कंपनी आहे. या कंपनीला देखील जामर आहेत. देशभरात या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत देखील नाही.

लोकसभेत बीएसएनएलएमटीएलचे नेटवर्क चलत नसताना फक्त  जिओचे नेटवर्क येत आहे. या कंपनीला जामरच्या बाहेर ठेवले आहे काहे योग्य नाही. जिओ कंपनीला  सपोर्ट केले जात आहे. त्यांच्यावर मेहरबानी का दाखविली जात आहे. जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर का आहे,  केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहेअसे विविध सवाल खासदार बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले. त्यावर पीठासीनावर विराजमान असलेल्या रमादेवी यांनी याबाबत अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतीलअसे सांगितले.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image