संशयितरित्या घुटमळणार्या इसमाविरोधात कारवाई
पनवेल, दि.६ (संजय कदम) ः संशयितरित्या कोणतातरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घुटमळत राहणार्या इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
अमानत मुसीबत अली (३५ रा.शिवपूर, उत्तरप्रदेश) हा इंडिया बुल्स ग्रीन सोसायटीच्या भिंतीलगत कोन गाव, ता.पनवेल या ठिकाणी कोणत्या तरी अज्ञात इराद्याने घुटमळत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व पोलीस शिपाई मनोहर इंगळे यांनी सदर इसमाला ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ख) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.