प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी ५ कोटी ४५ लक्ष ४२ हजार निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता




पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याचे फलित

अलिबाग,जि. रायगड,दि.२३ (जिमाका) :- पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन 2012-13 ते सन 2019-20 या वित्तीय वर्षात मंजूरी दिलेल्या कामांना सन 2020-21 या वर्षासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आवश्यक तो निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 
      
पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सन 2012-13 ते सन 2019-20 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील मंजूर झालेल्या पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी आवश्यक उर्वरित निधी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून शासनाने सन 2020-21 या वर्षासाठी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे रु. 5 कोटी 45 लक्ष 42 हजार निधी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
     
रायगड जिल्ह्यातील मंजूर कामे व त्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे  सन 2013-14 मध्ये मान्यता मिळालेल्या माथेरान येथील पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या रुपये 24 कोटी निधी पैकी पूर्वी रुपये 21 कोटी 43 लक्ष निधी वितरित करण्यात आला होता तर आता उर्वरित 2 कोटी 57 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता मिळाली आहे.
     सन 2017-18 मध्ये मान्यता मिळालेल्या अलिबाग तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी सुशोभीकरण करणे, या कामांतर्गंत  1.जमीन सपाटीकरणकरिता रुपये 5 हजार, 2) जमिनीच्या पायाभरणीसाठी खोदकाम करणे याकरिता रुपये 44 हजार, 3) बांधकामासाठी मुरुम, ग्रनाईट दगड यांचा पुरवठा करणे याकरिता रुपये 3 लक्ष 26 हजार, 4) इमारतीच्या एम-10 पायाभरणीसाठी सिमेंट काँक्रीटीकरण याकरिता रुपये 5 लक्ष 95 हजार, 5) ग्रॅनाईट, दगड, वाळू यांचा पुरवठा करणे याकरिता रुपये 9 लक्ष 97 हजार, 6) रंगरंगोटी व कोरीव कामासाठी ग्रॅनाईट प्लेटचा पुरवठा याकरिता रुपये 8 हजार, 7) टेस्टिंग चार्जेस फॉर मटेरीयल याकरिता रुपये 3 हजार अशा एकूण  रुपये 19 लक्ष 99 हजार निधी पैकी पूर्वी  रुपये 10 लक्ष निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित रुपये 9 लक्ष 99 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
      
सन 2017-18 अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे ग्रामपंचायत धोकवडे आर.सी.एफ. जेट्टीकडे जाणारा रस्ता  तयार करणे,  या कामांतर्गत  
1) रस्त्यासाठी मटेरियल पुरवठा याकरिता रुपये 8 लक्ष 76 हजार, 
2) 20 मी. मी. जाडीचा बिटूसम मुरुड (सर्व मटेरियल सहित) याकरिता रुपये 8 लक्ष 60 हजार 
3) बिटूसम लिकविड सिल कोट (सर्व मटेरियल सहित) याकरिता रुपये 2 लक्ष 54 हजार 
4) 25 मी. मी. जाडीचा मार्बल पुरवठा याकरिता 1 हजार 
5) संकीर्ण कामांकरिता रुपये 5 हजार अशा एकूण रुपये 19 लक्ष 96 हजार निधी पैकी रुपये 10 लक्ष निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित रुपये 9 लक्ष 96 हजार इतका  निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
      
याचबरोबर उणेगाव फाटा, गोरेगाव ता.माणगाव येथील गावतळ्याचे सुशोभीकरण करणे, या कामांतर्गत 1) तलावाचे खोलीकरण, संरक्षक भिंत, व्हिप होल्स, पदपथ, रेलिंग, बसण्याची व्यवस्था इत्यादी याकरिता रुपये 2 कोटी 51 लक्ष 11 हजार, 2) टेस्ट रिपोर्ट याकरिता रुपये 1 लक्ष 50 हजार, 3) बगीचा आणि कारंजे याकरिता रुपये 5 लक्ष, 4) कामगारांचा विमा  याकरिता रुपये 2 लक्ष 57 हजार 5) आकस्मिकता निधी करिता रुपये 10 लक्ष 31 हजार,  6) विद्युतीकरण (विद्युत जोडणीसह) याकरिता रुपये 10 लक्ष, 7) सल्लागार आणि वास्तूशास्त्रज्ञ याकरिता  रुपये 5 लक्ष 15 हजार, 8) जीएसटी करिता रुपये 32 लक्ष 49 हजार अशा एकूण  रुपये 3 कोटी 18 लक्ष 47 हजार निधी पैकी पूर्वी  रुपये 50 लक्ष निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित रुपये 1 कोटी 83 लक्ष 47 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.
     अशा प्रकारे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील माथेरान, काशिद, मांडवा तसेच उणेगाव येथील विविध कामांकरिता शासनाकडून एकूण रुपये 27 कोटी 58 लक्ष 42 हजार निधी पैकी पूर्वी रुपये 22 कोटी 13 लक्ष निधी वितरित करण्यात आला होता. तर आता उर्वरित रुपये 5 कोटी 45 लक्ष 42 हजार निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image