मिक्सरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
मिक्सरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पनवेल, दि. २५ (संजय कदम) ः पनवेलच्या दिशेने येणार्‍या स्कुटीचालकाला भरधाव कॉक्रीट मिक्सरच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पळस्पे जवळील डेरवली गावच्या हद्दीत घडली आहे.
आपल्या ताब्यातील स्कुटीवरुन पवनकुमार किशनलाल (61) हे कामोठे सेक्टर-17 मध्ये पुतण्याकडे राहाण्यास होते. पवनकुमार हे खोपोली येथे एका कंपनीत काम करत होते. त्यासाठी ते दरदिवशी कामोठे येथून खोपोली येथे स्कुटीवरुन जात होते. पवनकुमार नेहमीप्रमाणे स्कुटीवरुन आपल्या कामावर खोपोली येथे गेले होते. त्यांनतर सायंकाळी ते खोपोली येथून पनवेलच्या दिशेने परतत होते. पवनकुमार यांची स्कुटी कोन पनवेल रोडवर डेरवली गावच्या ब्रिजजवळ आली असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या काँक्रिट मिक्सरच्या ट्रकने पवनकुमार यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे पवनकुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल मधील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी काँक्रिट मिक्सरच्या ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image