बनावट व्हिजा; नायजेरियन नागरिकावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


पनवेल, दि.२५ (वार्ताहर) :-  खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी अटक केलेल्या निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) या नायजेरियन नागरिकाने बनावट व्हिजा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे तळोजा पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील नायजेरियन नागरिक निविग्वे इमिनके कोलिन्स उर्फ जन (34) याला एनआरआय पोलिसांनी ऑनलाईन खनिज, सीडस् आणि ऑईल खरेदी-विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी निविग्वे याच्या ताब्यातून पासपोर्ट आणि व्हिजाची छायांकित प्रत जप्त केली होती. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी निविग्वे याचा पासपोर्ट आणि व्हिजाच्या पडताळणीसाठी विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविले होते. त्यानुसार विशेष शाखेने निविग्वे याच्या पासपोर्ट आणि व्हिजाची पडताळणी केली असता, त्याच्याकडे आढळून आलेल्या व्हिजाची छायांकित प्रत बनावट असल्याचे आणि सदरचा व्हिजा दुसर्‍याच व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. निविग्वे या नायजेरियन नागरिकाने दुसर्‍याच्या नावाने असलेल्या व्हिजाची प्रत मिळवून, त्याद्वारे आपल्या नावाने व्हिजा तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image