पनवेल, दि.११ (वार्ताहर) :- पनवेल तालुक्यातील आपटा ग्राम पंचायत हद्दीतील कोरळवाडी आदिवासी बांधव आपल्या रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी अनेक वर्षे संघर्ष करीत असताना प्रशासकीय यंत्रांणा मात्र ’येरे माझ्या मागल्या’ च्याच भूमिकेत दिसत आहे तब्बल सात वर्षे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कडून ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत साडेसात लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही सदर आदिवासी वाडीच्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही याचे कारण म्हणजे पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आपटाचे ग्रामविकास अधिकारी व पनवेल पंचायत समितीच्या गट विकास अधिका-यांनी वन विभागाने डिसेंबर दोन हजार वीसला पाठविलेल्या वन हक्क दाव्यातील त्रुटींचे पत्र तीन महिने धूळ खात ठेवल्याने वन विभागाकडून ह्या कामासाठी परवानगी मिळू शकलेली नाही त्यामुळे निधी मंजूर असतानाही सदर रस्त्याचे काम सुरू झालेले नसून मार्च अखेर सदर रस्त्यासाठी मिळालेला निधी न वापरल्यास परत जाण्याची शक्यतेमुळे कोरलावाडी आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत सन 2020 च्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कोरलवाडीच्या रस्त्यांबाबत तारांकित प्रश्न विचारला गेला परंतू तरीही स्थानिक यंत्रणा ढिम्मच राहिली म्हणून देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा हाहाकार असताना देखील 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी आपल्या हक्कांसाठी जीवाची पर्वा न करता सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राष्ट्र सेवा दल रायगड यांच्यावतीने उपोषणाचा मार्ग अवलंबत उप विभागीय अधिकारी पनवेल यांचे कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेनंतर आदिवासी विकास प्रकलपाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून 7 लाख 50 हजार रुपयांच्या निधीस तात्काळ प्रशासकीय मंजुरी देण्यात आली मात्र या रस्त्यासाठी वनविभागाची जागा संपादित होत असल्याने ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत योग्य त्या कागदपत्रांसह सामुहिक वन हक्क दाव्याअंतर्गत 3(2) चे प्रस्ताव सादर करणें व भविष्यात सदर प्रस्तावामध्ये वनविभागाने त्रुटी काढल्यास त्यांची तात्काळ पूर्तता करणे हे ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांचे काम असताना त्याबाबत तीन महिन्यांपासून उप वनसंरक्षक रायगड यांचेकडून सदर प्रस्तावाबाबत त्रुटी पूर्ण करण्याचे पत्र देण्यात आले असताना दोन्ही यंत्रणा हातावर हात ठेवून बसले आहेत.सदर त्रुटींबाबत वाडीतील तरुण कार्यकर्ते गुरुदास वाघे,संतोष पवार यांच्यासह ह्या समस्येचा पाठपुरावा करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटून गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांना विचारणा केली परंतु त्यानंतरही संबंधितांकडून सदर त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली नाही त्यामुळे निधी मंजूर असतानाही निव्वळ कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे वनविभागाची परवानगी मिळू शकत नाही आणि त्यामुळे रस्त्याचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणून मागील तीन महिने निद्रिस्त असलेल्या गटविकास अधिकारी यांचा निषेध करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांचेवर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करून कोरलवाडीच्या मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी येत्या सोमवारी 15 मार्चपासून पासून गट विकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे लेखी कळविले आहे.
कोरलवाडी आदिवासी बांधव पुन्हा आक्रमक, सोमवार पासून पनवेल पंचायत समितीसमोर करणार बेमुदत उपोषण..