पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढून घेतले...


पनवेल, दि.१२ (वार्ताहर) :-  दोन अनोळखी इसमांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका इसमाकडून जवळपास १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेवून पसार झाल्याची घटना नावडे गाव परिसरात घडली आहे.
सुरेश म्हस्कर (५१) हे जोमा म्हात्रे विद्यालय मेन गेटसमोर नावडे गाव येथे असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले व त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडे असलेले सोन्याची चेन व अंगठी व इतर दागिने असा मिळून जवळपास १ लाख १४ हजार रुपये किंमतीचा ऐवज फसवणूक करून काढून घेवून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image