क्यु आर कोड फसवणूकीने मिळवून ओएलएक्सवर विक्रीस ठेवलेले फर्निचर पडले ९८ हजाराला...

पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेले फर्निचर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसमाने सदर मालकाचा क्युआर कोड मिळवून त्यातून त्याच्या खात्यातील ९८ हजार ४५६ रुपये वळते करून त्याची फसवणूक केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे.
खारघर वसाहतीत राहणारे सुरेश यादव यांनी ओएलएक्सवर विक्रीसाठी फर्निचर माहिती फोटो पोस्ट केले होते. सदर फर्निचर खरेदी करावयाचे आहे असे सांगून किशोर कुमार या व्यक्तीने त्यांच्या खात्यावर १ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना क्युआर कोड स्कॅन करा असे सांगितले. सदर कोड स्कॅन केल्यावर सुरेश यांच्या खात्यातून जवळपास ९८ हजार ४५६ रुपये वळते करून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबातची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments