पनवेल, दि.२१ :निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कमांक २, पनवेल, जि.रायगड या कार्यालयास गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार दि. २०/०३/२०२१ रोजी ठिक १४.१५ वाजता ईमानूल मर्सिहोम आद्रमच्या बाजुला, नदीकाठी असलेले शेतघर, खैरवाडी, पो. मोर्बे, ता पनवेल, जि. रायगड. येथे छापा घातला असता विविध उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करुन बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार
केलेल्या मद्याच्या सुमारे ७५० व १००० मि. ली. क्षमतेच्या एकूण ११० बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याचे उदा. बुचे, लेबल, टोचे, ब्रश, लॅमिनेशन मशिन इतर साहित्य व महिन्द्रा कंपनीची चारचाकी वाहन व एक ओपो कंपनीची मोबाईल असा एकंदर रुपये १३,२४,८६० किमंतीचा व रोख रक्कम १८,३५०/- असा मुद्देमाल जप्त केला व याबाबत १) शिबिन दिनेश तिय्यार वय २७ वर्षे रा- रुम नं. ०५, पहिला मजला, ए ३ बिल्डिंग, घरकुल हौसिंग सोसायटी, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड.
२) सुशिलाल सुकुमार तिय्यार वय ३३ वर्षे रुम नं. ०५, पहिला मजला, ए ३ बिल्डिंग, घरकुल हौसिंग
सोसायटी, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड. यांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (ओ) (डी) (ई) (एफ) ८१, ८३, ८६, ९० व ९८ अन्वये पंचनाम्या खाली अटक करण्यात आले आहे.
त्यातील फरार आरोपी प्रजीब प्रभाकरण के व जागा मालक यांस अद्याप अटक करणे बाकी आहे. सदर गुन्हयातील जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची (स्कॉच) कोण कोणत्या भागात विक्री केलेली आहे.याचा तपास सुरू आहे. सदर गुन्हयामध्ये अंतराष्ट्रीय टोळी असल्याची दाट शक्यता आहे.
सदर कारवाई मा. श्री. कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट राज्य मुंबई, श्रीमती. उषा राजेंद्र वर्मा संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे, श्रीमती. कीर्ती शेडगे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड- अलिबाग, विश्वजीत देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग, यांचे मार्गदर्शनाखाली एस. एस. गोगावले (निरीक्षक), अविनाश रणपिसे (निरीक्षक), वामन चव्हाण (निरीक्षक) एस. एस. गायकवाड (दुय्यम
निरीक्षक), ए. सी. मानकर (दुय्पम निरीक्षक), व्ही. बी. बोबडे (दुय्यम निरीक्षक) गोविंद
पाटील (दुय्यम निरीक्षक) सुभाष जाधव (सहाय्यक दुय्यम निरीक्षक) तसेच पालवे, संदीप पाटील, यु. एन. पंची (जवान) हाके (जवान-नि-वा. चालक) श्रीमती. एम. ए. मोरे (महिला
जवान) यांनी भाग घेतला. तसेच सोबत मनोज अनंत भोईर व अनंत दत्तु जगदाडे यांनी मदत
केली.
सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती. किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.