पनवेल, दि.१३ (वार्ताहर) :- पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे राहणार्या दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात इसमांनी कशाची तरी फूस लावून अपहरण केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
यातील एका मुलीचे वय ११ वर्षे असून रंग गोरा, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे लांब, उंची ५ फूट, चेहर्याच्या डाव्या नाक पुडीजवळ तीळ आहे. अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तीला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. तसेच तिच्या बरोबर तिची १६ वर्षीय बहिण रंग सावळा, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे व लांब, उंची साडेपाच फूट असून अंगात सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस, निळ्या रंगाची फुलाची डिझाईन व सफेद रंगाची पॅन्ट घातलेली आहे. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या दोन्ही मुलींबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 येथे संपर्क साधावा.