गुन्हे शाखा कक्ष २,पनवेलच्या धडक कारवाईत ३० लाखाचा गांजा हस्तगत

पनवेल, दि.३१ (वार्ताहर) ः गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये ३० लाखाचा गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी दोघा जणांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले आहेत.
पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील , यांनी नवीमुंबई येथे मोठया प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरु केली आहे. पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ चे पो. ना- प्रफुल्ल मोरे यांना बातमी मिळाली की  एक इनोव्हा कार क्र.चक04-उग-9363  मध्ये गांजा हा अमली पदार्थ असून ती कार टेंभुर्णी येथून पनवेल मार्गे मुंबईला जाणार आहे. सदर बातमी अन्वये अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील व पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली, सपोनि संदीप गायकवाड, पो. उप. निरीक्षक मानसिंग पाटील, पो. ह. साळूंखे, अनिल पाटील, सचिन पवार, पो. ना. डोंगरे व इतर अंमलदार यांनी सदरची इनोव्हा कार ही मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वरील पनवेल बायपास येथे सदर इनोव्हा कार तब्यात घेतली असता कार मध्ये मागील सीट, डिकी, दोन्ही सिटी मधील रिकाम्या जागेत असे एकूण 10 प्लास्टिक गोण्या मध्ये एकूण 30 लाख रुपये किमतीचा 200 किलो गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. सदरचा गांजा जवळ बाळगून वाहतूक केल्या कामी सदर कारचा ड्रायव्हर अशितोष आनंद पातुरे वय 21 रा. आझाद नगर चाळ, रूम नं 2, टेप व्हिलेज अंधेरी (प )मुंबई व त्याचा साथीदार आसिफ अब्दुल मेमन वय 26 रा. हनुमान नगर  रूम नं 1, एस बी रोड बोरवली पूर्व  मुंबई हे मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा साठा गुन्हे शाखा 2 पनवेल यांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 करीत आहे.
Comments