शिवसेनेच्या दणक्याने रा.जि.प. शाळा धामोळे येथे तोडलेली वीज पुन्हा जोडली..
पनवेल, दि.३ (संजय कदम) ः खारघर शहरातील धामोळे गाव येथील रा. जि.प. शाळेची वीज जोडणी कापली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात आणि प्रचंड उकाड्यात बसावे लागत होते. परंतु ही बाब स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने संबंधित महावितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्या शाळेला पुन्हा वीज जोडणी करून दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या समस्येसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी लगेच जिल्हा प्रमुख शिरीष घरत आणि जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने महावितरण अधिकार्‍यांशी चर्चा करून त्वरित जोडणी करून देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागप्रमुख गणेश म्हात्रे आणि लीलाताई कातकरी उपस्थित होते. त्यांच्या मागणीची दखल घेत महावितरण विभागाचे कर्मचारी तातडीने शाळेत आले व त्यांनी कापलेली विद्युत वाहिनी पुन्हा जोडून दिल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने शिवसेना आणि उपस्थित पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

(फोटो :- शाळेला पूर्ववत वीज जोडणी करून देताना शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, विभागप्रमुख गणेश म्हात्रे आणि लिलाताई कातकरी.)Comments