पनवेल महानगरपालिका व खारघर पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई ; उशिरापर्यंत सुरू असलेली हॉटेल्स सील...


पनवेल : वार्ताहर :- मुंबई तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काल रात्री वॉर्ड ऑफिसर  भंडारी,खारघर महानगरपालिका पनवेल यांचे पथकाने व खारघर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाईत खारघर परिसरातील 
1) हॉटेल भगत ताराचंद, 
2) हॉटेल व्हिलेज 12--20, 
3) रिलायन्स स्मार्ट, 
4) हॉटेल जेजेस रसोई, 
5) हॉटेल बी क्रीम 
6) शिवसागर हाॅटेल  व 
7) AKAYA फर्निचर हे विहित वेळेपेक्षा उशिरापर्यंत  सुरू ठेवताना मिळून आल्याने त्यांचे हॉटेल सील करण्याची कारवाई पनवेल महानगर पालिकेचे अधिकारी आणि खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व सहकारी यांचे सोबत संयुक्तरित्या करण्यात आली. 
Comments