नगरसेविका अरूणा दाभणे यांच्या प्रयत्नांना यश ; रस्त्याच्या कामाला सुरूवात..
पनवेल, दि.२४ (वार्ताहर) :-  पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील गावाच्या  मुख्य प्रवेशद्वारा जवळील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बौद्ध स्मशान भूमीजवळील रस्ता ते दत्ता म्हाञे यांच्या घरा पर्यतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा रस्ता कासाडी नदी व  कानपोली गावाला व पनवेला शहराला जोडला गेला आहे. या रस्त्यातून  भाजी व्यवसाय करणार्‍या महिला व शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. या परिसरात धुळीचे वातावरण निर्माण झाले होते. या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी मागच्या वर्षी अर्थात दिनांक 17 मार्च  2020 ला लेखी अर्ज स्वरुपात करण्यात आली होती. तब्बल एक वर्षानंतर 2021 मध्ये  स्थानिक नगरसेविका अरूणा दाभणे  यांच्या  प्रयत्नांना यश आले आणि  या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आज पासून सुरूवात झाली आहे. 
यावेळी रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी  स्थानिक नगरसेविका अरूणा दाभणे युवा नेता किरण दाभणे व चिंतामणी कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. यावेळी देविचापाडा व कानपोली गावातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका अरूणा किरण दाभणे यांचे विशेष आभार मानले. विकासाची गंगा खर्‍या अर्थाने देविच्यापाड्यात यायला सुरवात झाली असा विश्‍वास या परिसरातील नागरिकांना वाटू लागला आहे.
फोटो ः रस्त्याच्या कामाला सुरूवात
Comments