इनरव्हील संचालक मंडळाच्या कार्यकारिणी असोसिएशन सेक्रेटरीपदी अनुराधा चांडक ...

पनवेल, दि.८ (वार्ताहर) :-  ‘इनरव्हील’ ही जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय सामाजिक महिला संघटना आहे.  एकशे चार (१०४) पेक्षा अधिक देशांत ही संघटना कार्यरत आहे. प्रत्येक शहरातील स्थापित इनरव्हील क्लब्ज मिळून एक डिस्ट्रिक्ट बनतो. केवळ भारतामध्ये २७ इनरव्हील डिस्ट्रिक्ट असून १३६६ इनरव्हील क्लब्ज व ४५,९५९ महिला सभासद आहेत.  
सर्व डिस्ट्रिक्टचे आंतरराष्ट्रीय इनरव्हील संचालक मंडळ (गव्हर्निंग बॉडी)असून १६ संचालक असतात. अशा प्रतिष्ठित संचालक मंडळाच्या २०२१-२२ च्या असोसिएशन सेक्रेटरी म्हणून इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन अनुराधा चांडक यांची निवड झाली आहे. 

या नियुक्तीबद्दल  इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन प्रेसिडेंट ध्वनी तन्ना आणि सर्व क्लब मेंबर्स यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो :- सेक्रेटरीपदी अनुराधा चांडक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना ध्वनी तन्ना.
Comments