पनवेल रायगडचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री पनवेल दौऱ्यावर...

पनवेल /- दि.२०. रायगड व पनवेल चा पाणी प्रश्न मागील दहा वर्षापासून सातत्याने तापलेला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते जून पर्यंत  पनवेल महानगरपालिकेतील व सिडको मधील जनतेला नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावी लागते. पनवेलच्या पाणीप्रश्ना वरून फक्त राजकारणच सुरू असल्याने शिवसेनेने पुढाकार घेऊन पनवेल चा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते.                                         

ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी हे मागील दहा वर्षापासून सिडको राज्य सरकार जिल्हा परिषद व संबंधित सर्व यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करत आले आहेत . शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गवळी यांच्या सातत्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना मागील १२ महिन्यांपासून दोन वेळा स्मरण पत्र पाठवून पनवेलच्या पाणी प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. गवळी यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करून मुख्यमंत्री, पाणीपुरवठामंत्री, मुख्य सचिव, सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सर्व यंत्रणांकडे सविस्तर माहिती सादर करून पाठपुरावा सुरूच ठेवला होता तरीदेखील काही होत नसल्याने २०१४ साली गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती व त्याद्वारे पनवेल महानगरपालिका व संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत न्यायालयाला साकडे घातले होते अनेकवेळा सुनावणी होऊनही काही निष्पन्न होत नव्हते. आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात लावून धरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव नगर विकास यांना तपासून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सदर प्रश्न  प्रकरणी लक्ष घातल्याने शासकीय यंत्रणेच चक्र वेगाने फिरली असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहती, संपादित गावे व उर्वरित रायगडमधील पाण्याचा बिकट प्रश्न मार्गी लागावा या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पस्तीस वर्षे जुने असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रास स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी भेट देत आहेत. भोकरपाडा ते कळंबोली ही पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पस्तीस वर्षे जुनी असून प्रत्येक सोमवारी दुरुस्ती करता शटडाऊन बंद घ्यावा लागतो त्यामुळे पनवेल खारघर कळंबोली कामोठे व महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो हा त्रास कायमस्वरूपी संपावा याकरता ही जीर्ण अवस्थेतील पाईपलाईन बदली करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्राचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल व पनवेलचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल असा आत्मविश्वास जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ज्येष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी व्यक्त केला आहे.  मुख्यमंत्री आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील असा विश्वास गवळी यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रास भेट ही पनवेलवासीयांसाठी ग्रेट भेट ठरेल अशी चर्चा आहे.
Comments