पनवेल तालुका व शहर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी...
पनवेल / वार्ताहर :- पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (दि. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, परमेश्वर चिन्मय समेळ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.   
Comments