तोतया पोलिसाद्वारे भाजी आणण्यास गेलेल्या वृद्धेची फसवणूक....


पनवेल दि.२८ (वार्ताहर): भाजी आणण्यास गेलेल्या एका वृद्ध महिलेची फसवणूक तोतया पोलिसाने केल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.           
कुसूम ठक्कर (वय-६२) या से.-७ खारघर येथे भाजी आणण्यास गेल्या असताना तेथे काही अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले व आम्ही पोलिस असल्याची बतावणी करून तुमच्या अंगावरील दागिने काढून एका कागदात ठेवा असे सांगून त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवून हातचलाखीने सदर तोतया पोलिसांनी २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.       
Comments