डॉ.भूषणकुमार उपाध्याय,अतिरिक्त पोलीस महासंचालक यांचा "कुवल्यानंद योग" पुरस्काराने सन्मान...

पोलीस विभागामध्ये आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबवत योगाचा प्रचार व संवर्धनाचे काम करणारे डॉ . भुषणकुमार उपाध्याय , मा . अतिरिक्त पोलीस महासंचालक ( वाहतुक ) यांना लोणावळा येथील कैवल्यधाम याठिकाणी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करुन मा . राज्यपाल श्री . भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते " कुवल्यानंद योग " हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे . त्यावेळी कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद , सरचिटणीस श्री . ओ . पी . तिवारी , सहसंचालक ( संशोधन ) श्री . रणजितसिंह भोगल , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . सुबोध तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते . डॉ . भुषणकुमार उपाध्याय हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून , त्यांनी लिहीलेली काही पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत . त्यांना मानवतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सुरवातीपासून पोलीस दलातील काम केले आहे . पोलीस दलातील हुशार , विद्वान व शांत स्वभावाचे प्रेमळ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक असून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणून राज्यभर त्यांचा परिचय आहे . गेल्या सहा महिन्यांपासून ते महामार्ग ( वाहतुक ) पोलीस विभागाचे ते अपर पोलीस महासंचालक आहेत . वाहतुक विभागामाध्यील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुक दलातील अधिकाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करुन राज्यभर वेगवेगळया योजना राज्यभर राबवित असतात . महामार्ग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ते वेळोवेळी आपुलकीने विचारपूस करतात व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत करतात . तसेच महामार्गतील अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार नियुक्त्या देत असतात त्यामुळे अल्पावदीतच ते महामार्ग पोलीस दलात लोकप्रिय अधिकारी म्हणून प्रसिध्द झाले आहेत . डॉ . भुषणकुमार उपाध्याय यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला . पंढरपूर नगरीतील गुन्हेगारीचा त्यांनी पुर्णपणे बिमोड केला होता . ते त्यांचे कार्यक्षेत्रातील सामान्य व गरीब जनतेला सदैव मदत करीत त्यांनी गुन्हेगारांना वटणीवर आणले होते . त्यावेळी त्यांच्याकड़े सहा तालुक्यांची जबाबदारी असतांना त्यांच्या भितीमुळे साही तालुक्यातील गुन्हेगार हद्दीतून बाहेर निघून गेले होते . ते डॉ . भुषणकुमार उपाध्याय यांच्या बदलीनंतरच परत हद्दीत आले होते . डॉ . भुषणकुमार उपाध्याय यांची पदोन्नतीवर बदली झाली त्यावेळी सामान्य नागरीक व सर्वपक्षीय असा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आलेला होता व पंढरपूर याठिकाणी पोलीस अधीक्षक पद निर्माण करुन त्यांना , त्याचठिकाणी ठेवावे अशी मागणी जनतेकडून करण्यात आली होती . पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी म्हणून मोर्चे निघतांना पहायला मिळतात पण डॉ , भुषणकुमार उपाध्याय यांची बदली होऊ नये म्हणून सामान्य नागरीकांनी काढलेला पंढरपूरातील सगळ्यात मोठा मोर्चा होता . ते ज्या - ज्याठिकाणी बदलून गेले तेथील सर्वसामान्य नागरीकांनी त्यांना आपल्या हृदयातच ठेवले . ज्यावेळी ते तुरुंग विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांनी कारागृहातील कैदयांसाठी वेगवेगळया योजना राबविल्या . त्यांनी कैदी व त्याला भेटण्यास आलेल्या त्याच्या कटुंबियांची गळाभेट देण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगामध्ये राबविली होती . त्यामुळे तुरुंगातील कैदयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन शिक्षा भोगणान्या कैदयांनीही त्यांच्यावर जिवापाड प्रेम केले . डॉ . भुषणकुमार उपाध्याय , अतिरिक्त पोलीस महासंचालक ( वाहतुक ) यांना " कुवल्यानंद योग पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर महामार्ग वाहतुक पोलीस दलातील अधिकारी व अमलदार यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . .
Comments