पनवेल तालुका पत्रकार महासंघाचा अभिनव उपक्रम...
...............................................
संघटनेचे सचिव मयूर तांबडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
................................................
नवीन पनवेल(प्रतिनिधी): पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे सचिव मयूर तांबडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून नुकताच संपन्न झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहात अन्नधान्य वाटप करण्यात आले तर नेरेपाडा येथील आदिवासी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे खजिनदार सुधीर पाटील यांनी केवड्याचे रोपटे देऊन तर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
             यावेळी जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, सचिव तथा दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे, खजिनदार तथा आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, दैनिक,  मुंबई चौफेरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, दिशा न्यूज चॕनलचे संपादक सुनिल कटेकर, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, स्नेहकुंज आधारगृहाचे विश्वस्त नितीन जोशी, संगिता जोशी, सामाजिक कार्यकर्ते  राजेश पाटील,  यशवंत बिड्ये, अविनाश रोडपालकर, संदीप रोडपालकर, सोहम भोपतराव, प्रेयाली भोपतराव उपस्थित होते.
Comments