जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था व निर्माण डायग्नोस्टिक सेंटर तर्फे रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन..


पनवेल / वार्ताहर :-  जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थापनवेल आणि निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्यातर्फे १९ फेब्रुवारी रोजी शेकाप जनसंपर्क कार्यालयसेक्टर १०खांदा कॉलनी येथे रक्तदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शेकाप जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे सकाळी दहा ते चार या वेळेत रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर प्रीतम म्हात्रेनवी मुंबईचे युवा नेते वैभव नाईक,   नगरसेवक गणेश कडूसौरभ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. 

Comments