पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम...

पनवेल, दि.२४ (संजय कदम) :- आज पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेडुंग टोल नाका येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक खेडकर यांच्यासह 03 सपोनि, 02 पोउपनि, 22 पोलीस अंमलदार तसेच नवीन पनवेल येथील अग्निशमन दलाचे 1 अधिकारी व 5 फायरमॅन टेंडर व्हेन व ऍम्ब्युलन्स तसेच झोन 2 स्ट्रायकिंग चे 08 पोलीस अंमलदार, नवीन पनवेल वाहतूक शाखेचे 01 अधिकारी व 6 पोलीस अंमलदार असे हजर होते.
फोटो ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून घेण्यात आलेली रंगीत तालीम
Comments