पनवेल / वार्ताहर :कोविड सारख्या बिकट परिस्थितीत रुग्णांची सेवा करणाऱ्या या खऱ्या कोविड योद्धयांना एकत्रित आणण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने दि. १३ ते १४ फेब्रुवारी या दोन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. १३ रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली.यावेळी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी पहावयास मिळाली.मोठ्या उत्साहात या स्पर्धेला सुरुवात झाली.या
कोविड मुळे संपूर्ण वर्षभर अत्यंत व्यस्त असलेले डॉक्टरांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत आपल्या अंगी असलेले कलागुण यावेळी दाखविले. या स्पर्धा २०२१ च्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, डॉ बी जे बिरमोळे, सभापती सुशीला घरत , नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत आदी मान्यवर उपस्थित केले. यावेळी डॉक्टर गुणे यांनी मोठ्या संख्येने स्पर्धांच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले.या स्पर्धा २०२१ मध्ये टेनिस क्रिकेटसह महिला डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट (अंडरआर्म क्रिकेट ) तसेच बॅडमिंटन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातील रोहा, कर्जत, पेण, रसायनी, पनवेल , मुरुड आदी सहा संघामध्ये साखळी सामने रंगले. या सामन्यादरम्यान डॉक्टरांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी पहावयास मिळाली. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल, सचिव डॉ रवींद्र राऊत, उपाध्यक्ष डॉ सागर चौधरी,डॉ सागर ठाकुर, डॉ संदेश बहादकर,डॉ यासिन शेख, डॉ शिरीष जोशी, डॉ प्रकाश पाटील, डॉ. गजेंद्र सिलीमकर , डॉ सिद्धार्थ कौशिक, डॉ सचिन पाटील , डॉ सोनल सेठ, डॉ अनघा चव्हाण आदींनी मेहनत घेतली.